Posts

Showing posts from December, 2020

मी या वाटेने

Image
 मी या वाटेने एकदाच जाणार आहे आणि मला जायंच आहे, कसं माहीत नाही, कुठे माहीत नाही, पण एक दिवस मला नक्की जायचं आहे,सहमतीने किंवा सहमती शिवायं,जगात जे काही चांगलं,शाश्वत असेल,करण्याजोगे असेल ते अनुभवून बघायचं आहे,डोंगराच्या मागून हसणारा सूर्य सकाळी उठून टिपायचा आहे,कोवळ्या असलेल्या हातांना   संभाळून त्यांचे निरागस हसु बघायचं आहे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आधार वंचित झाडांना तुम्ही आहात तर आम्ही आहोत मोठयाने ओरडून सांगायचं आहे,दुःख झेलणाऱ्या एकाकी हाडांना अस्तित्वात आनंदी बघायचं आहे,कारण मी या वाटेने एकदाच जाणार आहे!! 

कवी मनाचा

Image
कवी मनाचा!!  सुई मध्ये धागा ओवावा तसा जो शब्दांना गुंफत लोकांसमोर खऱ्या जगाची वास्तविकता मांडतो तो असतो कवी मनाचा ! समाजातील काटेरी कुंपणावर मधुर शब्दांची सांगड घालत,  जो सुंदर फुलांच्या पाकळ्या गोळा करत फिरतो तो असतो कवी मनाचा ! मनाने ढासळलेल्या नित्यकर्मी डोळ्यांना जो आशेचा नवा सुर्य दाखवतो तो असतो कवी मनाचा ! मळवटलेल्या आणि चिखलदरी वाटांमध्ये जो काल्पनिक पण सुंदर शब्दांच बीज रोवतो तो असतो कवी मनाचा!  आपलं दुःख दडवून जो जगाच्या रंगमंचावर सगळ्यांना हसवतो तो असतो कवी मनाचा !!