मी या वाटेने
मी या वाटेने एकदाच जाणार आहे आणि मला जायंच आहे, कसं माहीत नाही, कुठे माहीत नाही, पण एक दिवस मला नक्की जायचं आहे,सहमतीने किंवा सहमती शिवायं,जगात जे काही चांगलं,शाश्वत असेल,करण्याजोगे असेल ते अनुभवून बघायचं आहे,डोंगराच्या मागून हसणारा सूर्य सकाळी उठून टिपायचा आहे,कोवळ्या असलेल्या हातांना
संभाळून त्यांचे निरागस हसु बघायचं आहे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आधार वंचित झाडांना तुम्ही आहात तर आम्ही आहोत मोठयाने ओरडून सांगायचं आहे,दुःख झेलणाऱ्या एकाकी हाडांना अस्तित्वात आनंदी बघायचं आहे,कारण मी या वाटेने एकदाच जाणार आहे!!

Comments
Post a Comment