कवी मनाचा

कवी मनाचा!! 

सुई मध्ये धागा ओवावा तसा जो शब्दांना गुंफत लोकांसमोर खऱ्या जगाची वास्तविकता मांडतो तो असतो कवी मनाचा !

समाजातील काटेरी कुंपणावर मधुर शब्दांची सांगड घालत,  जो सुंदर फुलांच्या पाकळ्या गोळा करत फिरतो तो असतो कवी मनाचा !

मनाने ढासळलेल्या नित्यकर्मी डोळ्यांना जो आशेचा नवा सुर्य दाखवतो तो असतो कवी मनाचा !

मळवटलेल्या आणि चिखलदरी वाटांमध्ये जो काल्पनिक पण सुंदर शब्दांच बीज रोवतो तो असतो कवी मनाचा! 

आपलं दुःख दडवून जो जगाच्या रंगमंचावर सगळ्यांना हसवतो तो असतो कवी मनाचा !!





Comments

Popular posts from this blog

Puri Express And Fear Of Wife

मी या वाटेने